दिल्ली स्वतंत्र झाल्याची बातमी विद्युद्वेगाने पसरत असतां तिच्या आकस्मिकतेनें सर्व हिंदुस्थानभर स्वकीयांस व परकीयांस क्षणभर स्तिमित करून सोडलें अंग्रजांना तर आपण अकतो आहोत त्याचा अर्थ काय हि झटकन ग्रहण करता येना. सर्व देशभर शांतता नांदत आहे अशा खात्रीनं कलकत्यास लॉर्ड कॅनिंग घोरत पडले होते व अकडे कमान्डर -अन-चीफ अॅन्सन सिमल्याच्या थंड हवेंत जाण्यासाठीं सजलेले होते. त्यांना प्रथमतः जेव्हां दिल्ली स्वतंत्र झाल्याची अक तुटक तार आली तेव्हां त्या तारेचा अर्थहि धड त्यांच्या ध्यानांत येश्रीना! ही बातमी अंकून अिंग्रजांची तारांबळ अडाली तितकीच विस्मयानें स्तिमित झालेल्या सर्व हिंदुस्थानी लोकांचीहि भुडालेली होती. कारण दिल्लीच्या या अकल्पनीय अठावणीने क्रांतिरचनेची सर्व घडी विस्कळीत झाल्यासारखे झालेलें होतें व दिल्लीच्या बंडाचे दिवशीं अकदम घाला पडल्याने घाबरून गेलेल्या अिंग्रजांच्या हातून जे लष्करी प्रमाद घडले ते आतां पुन्हां घडण्याचा संभव नव्हता. ह्या आकस्मिक धक्क्यानें सावध झालेल्या भिंग्रज लोकांना भावी संकटाची सूचना मिळाल्यानें त्या संकटाचें परिहरण करण्याची संधि सांपडली. अकल्पित घाला पडल्यानें दिल्लीचें सिंहासन जसे अक-दोन दिवसांत त्यांच्या हातून हिसकून घेता आले तसेच ता. ३१ मेला पूर्वसंकेताप्रमाणे अकसमयावच्छेदे करून जर सार्वत्रिक स्फोट झाला असता तर सर्व हिंदुस्थानचे सिंहासन पहिल्या घडकीसरशी हातीं घेता आले असतें. परंतु तो बेत ह्या मीरतच्या अठावणीनें जरी फसला होता, तथारि दिल्ली ताब्यांत आल्यानें बंडाला राज्यक्रांतीचे स्वरूप मिळून सर्व हिंदुस्थानभर या अत वार्तेनें अक विलक्षण चेतना अत्पन्न झालेली होती. आतां या चेतनेचा फायदा घेवून अकदम अठावें कीं पूर्व संकेताप्रमाणे ३१ मेपर्यंत वाट पाहावी ? दिल्लीच्या अठावणीची वार्ता अकून अितरत्र काय येत चाललेला आहे १ दिल्लीच्या घानीमुळे जसा हा घोंटाळा झाला तसाच अितर ठिकाणांची संमति घेतल्याशिवाय आपणहि अठावणी केली असतां आणखी घोटाळा माजणार नाहीं कशावरून ? अशा अनेक विचारांच्या अनिश्चिततेमुळें क्रांतिकारक पुढाऱ्यांना काय होतें तें पाहात ठिकच्या ठिकाणीं थांबून बसणे भाग पडलें.
Books, Hindi
Rashbehari Basu (Hindi-2)
दिल्ली स्वतंत्र झाल्याची बातमी विद्युद्वेगाने पसरत असतां तिच्या आकस्मिकतेनें सर्व हिंदुस्थानभर स्वकीयांस व परकीयांस क्षणभर स्तिमित करून सोडलें अंग्रजांना तर आपण अकतो आहोत त्याचा अर्थ काय हि झटकन ग्रहण करता येना. सर्व देशभर शांतता नांदत आहे अशा खात्रीनं कलकत्यास लॉर्ड कॅनिंग घोरत पडले होते व अकडे कमान्डर -अन-चीफ अॅन्सन सिमल्याच्या थंड हवेंत जाण्यासाठीं सजलेले होते.










Reviews
There are no reviews yet.