कानपूरला आपल्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे व तात्या टोपे हे रात्री बाराचे सुमारास ब्रह्मावतीस येथून पोंचले, व तेथे ती रात्र घालवून दुसरे दिवशीं सकाळीं त्यांचे कनिष्ठ बंधु बाळासाहेब, पुतणे रावसाहेब व तात्या टोपे ही मंडळी राजवंशांतील स्त्रीसमूहासह नावांत बसून गंगानदी भुतरली व लखनी प्रांतांतील फत्तेपूर शहरीं येऊन पोचले. येथें असलेला श्रीमंत नानांचा परम स्नेही चौधरी भोपालसिंह ह्यानें त्या सर्वांचें आदरातिथ्यपूर्वक स्वागत केले व आपले येथे त्या सर्वांना ठेवून घेतलें. मध्यंतरी कानपूरच्या लाथाळीत विस्कळित झालेलें सैन्य पुन्हां व्यवस्थित करण्यामध्यें नाना गुंतलेले होते. थोडेच दिवसांत बंड करून अठलेली ४२-बी रेजिमेंट नानांचे निशाणाखाली लढण्याचा संकल्प करून शिवराजपुरापर्यंत आली व तिथून तिनें सर्व संमतीनें श्रीमंत नानांना आपल्यास घेऊन जाण्याबद्दल कोणीतरी अधिकारी मनुष्य घाडावा म्हणून विनंती धाडली. या विनंतीप्रमाणे श्रीमंत नानांनी तात्या टोपे यांस शिवराजपुराकडे त्या रेजिमेंटला आणण्याचा अधिकार देथून रवाना केलें व त्याचप्रमाणे तात्यांनी त्या रेजिमेंटला नानांच्या ध्वजाखालीं आणले. तात्यांना है शिवराजपुरचे सैन्य मिळतांच त्यांनी हॅवलॉकचे पाठीवर मार्गे सांगितल्याप्रमाणे, डावपेचांना आरंभ केला व अखेर त्या आंग्लवीराला अयोध्येतून खेचून परत कानपूरला आणले. हॅवलॉक कानपूरला येथून पाहतो तो हा विचित्र मराठा ब्रह्मावर्ताचे वाडयांत अगदी पूर्वीप्रमाणें मारे राज्य करून राहिलेला! तेव्हां पुन्हां अकदा ब्रह्मावती निकराची लढाओ करणें आंग्ल सेनेस भाग पडलें. या लढाओंत पराजय पावतांच गंगानदी अतरून तात्या ससैन्य नानांना फत्तेपूरला येथून मिळाले. थोडेच दिवसांत ग्वाल्हेरचे सैन्यास: फितूर करण्याचा बेत नानांचे दरबारांत घाटू लागला. या कामावर तात्याशिवाय कोणाची योजना अिष्टतर होणारी आहे ? ज्या विलक्षण डोक्यानें आजपर्यंत सबंध रेजिमेंटच्या रेजिमेंटस् गुप्तरीतीनें पोखरून बंडाच्या धाडसी कमीस भारतांत प्रवृत्त केल्या त्या या कावेबाज मराठ्यानेंच ग्वाल्हेरचे सैन्य फितवावयास गेलें पाहिजे! ताबडतोब तात्या टोपे ग्वाल्हेरला गुप्तरूपानें गेले
Books, Hindi
Rashbehari Basu (Hindi-5)
कानपूरला आपल्या सैन्याचा पराभव झाल्यानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे व तात्या टोपे हे रात्री बाराचे सुमारास ब्रह्मावतीस येथून पोंचले, व तेथे ती रात्र घालवून दुसरे दिवशीं सकाळीं त्यांचे कनिष्ठ बंधु बाळासाहेब, पुतणे रावसाहेब व तात्या टोपे ही मंडळी राजवंशांतील स्त्रीसमूहासह नावांत बसून गंगानदी भुतरली व लखनी प्रांतांतील फत्तेपूर शहरीं येऊन पोचले.










Reviews
There are no reviews yet.